भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रथमेश सावंत यांची निवड

सातारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसपदी विसापूर (ता. खटाव) येथील युवा कार्यकर्ते प्रथमेश कृष्णात सावंत यांची निवड करण्यात आली आहे....

Font Size:
जाहिरात / Advertisement
Live Maharashtra 24
भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रथमेश सावंत यांची निवड

सातारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसपदी विसापूर (ता. खटाव) येथील युवा कार्यकर्ते प्रथमेश कृष्णात सावंत यांची निवड करण्यात आली आहे. आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विसापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्व. संपतराव माधवराव सावंत (आबा) यांचे मोठे योगदान राहिले आहे. विसापूर ग्रामपंचायत आणि विकास सेवा सोसायटीवर सुमारे ३० ते ३५ वर्षे त्यांचे नेतृत्व होते. सलग १५ वर्षे सरपंचपद भूषविताना त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शांत, संयमी आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा वारसा आजही विसापूर व पंचक्रोशीत आदराने जपला जात आहे.

स्व. संपतराव सावंत आबांचे नातू आणि युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांचे पुतणे प्रथमेश सावंत यांनी आजोबांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध सामाजिक उपक्रम, युवकांचे संघटन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे.

युवकांना संघटित करून भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच युवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रथमेश सावंत यांनी सांगितले.

या निवडीबद्दल श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, भाजप जिल्हा सरचिटणीस भरत मुळे आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे यांनी प्रथमेश सावंत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories