डीपी चोरांना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची रात्रीची धडक मोहीम!

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा मैदानात; २२ ऑक्टोबरपासून गावोगावी काटेकोर गस्त सुरूच राहणार

Font Size:
जाहिरात / Advertisement
Live Maharashtra 24
डीपी चोरांना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची रात्रीची धडक मोहीम!

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा मैदानात; २२ ऑक्टोबरपासून गावोगावी काटेकोर गस्त सुरूच राहणार


सातारा : सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रांच्या (डीपी) चोरीच्या घटना रोखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. २२ ऑक्टोबरपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये नियमित आणि काटेकोर रात्रीची गस्त सुरू आहे.


डीपी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः पुढाकार घेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीच्या गस्तीसाठी आवाहन केले. त्यानंतर पोलीस पथके संबंधित गावांतील महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत रात्रीची गस्त घालत आहेत. डीपी असलेल्या ठिकाणांची पाहणी करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक ठिकाणी तातडीने तपासणी करणे, यावर भर दिला जात आहे.


या मोहिमेत प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ, तरुण तसेच संबंधित गावातील महावितरणचे कर्मचारीही सहभागी होत आहेत. रात्रीच्या गस्तीमध्ये पोलिसांना सहकार्य करणे, गावातील विद्युत रोहित्रांची माहिती देणे आणि संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना कळविणे, अशा माध्यमातून गावपातळीवरही सतर्कता ठेवली जात आहे.


विशेष म्हणजे, डीपी चोरी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही रात्रीची गस्त केवळ काही दिवसांपुरती मर्यादित नसून यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. तसेच अचानक आणि अनपेक्षितपणे गस्त घालण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे डीपी चोरांवर पोलिसांची नजर कायम राहणार आहे.


पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शन, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा प्रत्यक्ष पुढाकार, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत, प्रत्येक गावातील महावितरण कर्मचाऱ्यांचे सहकार्य तसेच पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ आणि तरुणांचा सहभाग यामुळे ही मोहीम सामूहिक समन्वयातून राबविली जात आहे.


पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचे शेतकऱ्यांनाही आवाहन!


पोलिसांची गस्त आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य सुरू असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातील डीपीच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. डीपीची वेळोवेळी पाहणी करावी. परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, महावितरण कर्मचारी आणि ग्रामस्थांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. पोलीस, महावितरण, ग्रामपंचायत आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे सतर्क राहिल्यास डीपी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास निश्चितच मदत होईल.


LIVE महाराष्ट्र 24

निष्पक्ष, थेट आणि वेगवान न्यूज

जाहिरात / Advertisement
Sp construction
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories