डीपी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी युवकांनी पोलिसांना सहकार्य करावे
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन; गावात रात्रीच्या गस्तीचे नियोजन वडूथ : गावामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या डीपी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता ग...
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन; गावात रात्रीच्या गस्तीचे नियोजन
वडूथ : गावामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या डीपी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता गावातील युवकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे यांनी केले आहे.
गावातील वीज वितरण रोहित्रांच्या (डीपी) चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गावाच्या सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये दररोज पाच इच्छुक युवकांसह दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्ड सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास तसेच चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी मदत होणार आहे. गावातील युवकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक युवकांनी दररोज रात्री ठीक ११.३० वाजता गावातील चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावातील वीजपुरवठा यंत्रणेचे संरक्षण, सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे ठरणार आहे.