माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून अनंत इंग्लिश स्कूलच्या विकासाला नवी दिशा!

माजी विद्यार्थी संघाची स्थापना; शहाजी संभाजी देशमुख यांची अध्यक्षपदी निवड

Font Size:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून अनंत इंग्लिश स्कूलच्या विकासाला नवी दिशा!



माजी विद्यार्थी संघाची स्थापना; शहाजी संभाजी देशमुख यांची अध्यक्षपदी निवड

सातारा : शाळेच्या आठवणींना उजाळा देतानाच मातृसंस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याच्या उद्देशाने अनंत (पॉप्युलर) इंग्लिश स्कूल, सातारा येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. शाळेच्या गौरवशाली परंपरेचे जतन, शैक्षणिक विकासाला हातभार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या संकल्पनेतून या संघाची स्थापना करण्यात आली आहे.

या संघाच्या अध्यक्षपदी शहाजी संभाजी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी महेश शंकर गोगावले, सचिवपदी दीपक मनोहर सुतार, तर खजिनदारपदी योगेश हेमंत त्रिगुणे यांची निवड झाली आहे.

कार्यकारी संचालक मंडळामध्ये सुहास दत्तात्रय कुलकर्णी, अनिल विलास रसाळ, अंजना शिवाजी शिंदे, सागर निवृत्ती सुतार, विलास श्रीरंग त्रिंबके, निलेश अशोक टिळे, अभिजीत सुधीर उपाध्याय, सौ. विभावरी अमरसिंह शिंदे आणि नासिर मुसा बागवान यांचा समावेश आहे.

माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून केवळ माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन किंवा एकत्रीकरण एवढ्यापुरते मर्यादित न राहता शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस उपक्रम राबविण्याचा मानस आहे. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शाळेच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी सहकार्य, सामाजिक उपक्रमांचे आयोजन तसेच माजी विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी संघ कार्यरत राहणार आहे.

शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, कौशल्य आणि योगदान शाळेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांची ताकद शाळेच्या विकासासाठी एकत्र येणार असल्याचे चित्र आहे.

नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ. चेतनाताई माजगांवकर, संस्थेचे संचालक मंडळ, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories