२४ तासांपासून नववीतील विद्यार्थी बेपत्ता; पोलीस व श्वानपथकाकडून शोधमोहीम, नागरिकांना कळकळीचे आवाहन
आसगाव : आसगाव ता.जि. सातारा येथील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणारा आदर्श शैलेश कांबळे हा विद्यार्थी बेपत्ता होऊन २४ तास उलटले आहेत. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत असून, आदर्श सुखरूप मिळावा यासाठी सर्वत्र शोध सुरू आहे.
आदर्श हा शाळेत जाण्यासाठी सकाळी सुमारे १०.३० वाजता घरातून निघाला होता. मात्र, तो शाळेत पोहोचला नसल्याचे समोर आले. त्यानंतर तो घरीही परतला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य सुरू केले. श्वानपथकाच्या मदतीनेही शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अद्याप आदर्शचा ठावठिकाणा लागलेला नाही.
नागरिकांना कळकळीचे आवाहन!
आसगावसह सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आदर्शचा फोटो आणि ही माहिती काळजीपूर्वक पाहावी. तो कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधावा. एखादी छोटीशी माहितीही आदर्शचा शोध घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
संपर्क :
शैलेश कांबळे (वडील) – 9527338607
पोलीस मदत – ११२
एक विनंती… ही बातमी केवळ वाचून पुढे जाऊ नका. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे आदर्शचा शोध लागण्यास मदत होऊ शकते.
आदर्श सुखरूप घरी परतावा, हीच सर्वांची अपेक्षा!