*साताऱ्यात २६ नोव्हेंबरला सूर्यकिरण एअर शोचा थरार !

सैनिक स्कूलच्या मैदानावर नऊ विमानांची हवाई कसरत; २० हजार प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, सुरक्षेसह विविध सुविधांचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशसातारा...

Font Size:
जाहिरात / Advertisement
Live Maharashtra 24
*साताऱ्यात २६ नोव्हेंबरला सूर्यकिरण एअर शोचा थरार !



सैनिक स्कूलच्या मैदानावर नऊ विमानांची हवाई कसरत; २० हजार प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, सुरक्षेसह विविध सुविधांचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश




सातारा



साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या प्रांगणात २६ नोव्हेंबर रोजी सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या नऊ विमानांचा चित्तथरारक एअर शो रंगणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या हवाई प्रात्यक्षिकांसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमाला सुमारे २० हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.


एअर शोच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, परिवहन विभाग, नगरपालिका यांसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


एअर शो पाहण्यासाठी येणाऱ्या २० हजार प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेसह कार्यक्रमस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. कार्यक्रमादरम्यान कोणतीही आपत्कालीन किंवा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी दोन रुग्णवाहिका आणि एका छोटेखानी रुग्णालयाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


याशिवाय वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, अल्पोपहार, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि फिरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


संबंधित विभागांच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आपल्या विभागाचा नियोजन आराखडा तातडीने तयार करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सर्व विभागांच्या समन्वयातून सर्वसमावेशक नियोजन आराखडा तयार करावा आणि हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.


नऊ विमानांच्या हवाई कसरतींचा थरार अनुभवण्याची संधी साताऱ्यातील नागरिकांना मिळणार असल्याने या एअर शोबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories