सातारा जिल्हा पोलीस दलात पदोन्नतीचे वारे

४६ पोलीस अंमलदार, २४ पोलीस उपनिरीक्षक, ११ सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ जणांना पोलीस हवालदारपदी पदोन्नतीसातारा सातारा जिल्हा पोलीस दलातील एकूण ४६ पोलीस अंम...

Font Size:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)



४६ पोलीस अंमलदार, २४ पोलीस उपनिरीक्षक, ११ सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ जणांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती


सातारा 


सातारा जिल्हा पोलीस दलातील एकूण ४६ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, तर ११ पोलीस नाईक व पोलीस शिपायांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


गृहविभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि सुकाणू समितीच्या निर्देशांनुसार विहित अटी व नियमांच्या अधीन राहून या पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. अनेक वर्षे पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.


श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये अफसर इनामदार, प्रकाश माने, आनंदराव भोईटे, नंदकुमार घाटगे, रविकांत  ढाणे, महेश कदम, दीपक जाधव, मनोहर सुर्वे, हिमेश माने, संजय साबळे, संजय जाधव, सुनील गायकवाड, तानाजी घोरपडे, प्रकाश कदम, महेश कमाने, रविंद्र कदम, प्रवीण शिंदे, उज्वला कुंभार, कांतीलाल नवघणे, जनार्दन खंडाळे, संजय चव्हाण, संजय मदने, दीपक बर्गे आणि संजय सपकाळ यांचा समावेश आहे. 

          तर सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये आनंदा कदम, दत्तात्रय लोखंडे, काकासाहेब पाटील, संतोष शिंदे, प्रतिभा कर्पे, रियाज शेख, सचिन देशमुख, महादेव घाडगे, प्रवीण चव्हाण, मल्हारी भिसे आणि दादासो यादव यांचा समावेश आहे.


पोलीस हवालदारपदी पदोन्नती झालेल्यांमध्ये संदीप जाधव, हेमंतकुमार ढाणे, संदीप इंगळे, ज्ञानेश्वर टिंगरे, राकेशु घाडगे, अनिलकुमार खाडे, सागर रासकर, संदीप फणसे, सुधीर वाघमारे, बाळकृष्ण नष्टे आणि दत्तात्रय धायगुडे यांचा समावेश आहे.


दरम्यान, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव यांनी पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories