सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी दोन क्रेन भाडेतत्त्वावर घेणार

इच्छुक क्रेनमालकांना ५ डिसेंबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहनसातारा, दि. २७ : सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासह न...

Font Size:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी दोन क्रेन भाडेतत्त्वावर घेणार

इच्छुक क्रेनमालकांना ५ डिसेंबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

सातारा, दि. २७ : सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासह नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दोन क्रेन (टो-गाड्या) भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

शहरातील नो पार्किंग क्षेत्रात उभी केलेली वाहने, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, अपघातग्रस्त वाहने तसेच बेवारस वाहने टोईंग करण्यासाठी या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना या क्रेनची मदत घेतली जाणार आहे.

यासाठी दोन क्रेन ११ महिन्यांच्या कालावधीसाठी अटी व शर्तींच्या कराराने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. इच्छुक क्रेनमालकांनी आपली दरपत्रके अथवा निविदा बंद लखोट्यात ५ डिसेंबर २०२६ पर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर, रविवार पेठ, सातारा येथे सादर करावीत.

निविदा सादर करताना क्रेनमालकांनी स्वतःची क्रेन प्रत्यक्ष तपासणीसाठी वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर येथे हजर करणे आवश्यक आहे. निविदेसंदर्भातील अटी व शर्तींची सविस्तर माहिती वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

असे आवाहन सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories