थेट कर्ज योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८० लाभार्थ्यांची निवड

महिलांसह पुरुषांनाही स्वयंरोजगाराची संधी; एक लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्जसातारा, दि. २७ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज य...

Font Size:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
थेट कर्ज योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८० लाभार्थ्यांची निवड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठ

महिलांसह पुरुषांनाही स्वयंरोजगाराची संधी; एक लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज

सातारा, दि. २७ : 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ४० महिला आणि ४० पुरुषांचा समावेश असून, या निवडीमुळे गरजू घटकांना स्वयंरोजगार सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महामंडळाकडे या योजनेसाठी एकूण १३८ अर्ज प्राप्त झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांच्या उपस्थितीत लाभार्थी निवडीची प्रक्रिया पार पडली. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १५ महिला व १५ पुरुष अशा एकूण ३० लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली. तर सन २०२५-२६ या वर्षासाठी २५ महिला व २५ पुरुष अशा एकूण ५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या समाजघटकांतील गरजू व्यक्तींचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सातारा जिल्ह्यासाठी २०२४-२५ मध्ये ३० आणि २०२५-२६ मध्ये ५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुसार एकूण ८० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

ही माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत घनवट यांनी दिली.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

Related Stories