आसगाव :
आसगाव येथील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेला आदर्श शैलेश कांबळे हा विद्यार्थी आज सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास शाळेला जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, तो शाळेत पोहोचला नसल्याची माहिती मिळाली असून, अद्याप घरीही परतलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.
आदर्शचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. आदर्श कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने त्याचे वडील शैलेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क : शैलेश कांबळे (वडील) – 9527338607
तसेच, नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. आदर्शचा फोटो आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून त्याच्या शोधकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.