आठ वर्षांनंतर ‘किसन वीर’ची साखर शेतकऱ्यांच्या घरी!

२७ ऑक्टोबरपासून साखर वाटपाला सुरुवात; प्रतिकिलो २० रुपये दराने मिळणार साखर

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
आठ वर्षांनंतर ‘किसन वीर’ची साखर शेतकऱ्यांच्या घरी!
सातारा, दि. २४ ऑक्टोबर : मकरंदआबांनी दिलेला शब्द पाळला; सभासदांसह बिगर सभासदांचीही दिवाळी होणार गोड : प्रमोद शिंदे २७ ऑक्टोबरपासून साखर वाटपाला सुरुवात; प्रतिकिलो २० रुपये दराने मिळणार साखर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले साखर वाटप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंदआबा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या शेतकऱ्यांसाठी अधिक गोड होणार आहे. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबरपासून दोन्ही कारखान्यांच्या सभासदांसह पात्र बिगर सभासदांनाही साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. किसन वीर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ना. मकरंदआबा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास आठ वर्षांपासून बंद असलेली साखर वाटपाची परंपरा पुन्हा सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडणार असल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले. कोणाला किती साखर मिळणार? किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या साखर वाटपाचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. * १० किलो साखर : ज्या सभासदांचा ऊस गळीतासाठी आलेला आहे. * ५ किलो साखर : ज्या सभासदांचा ऊस गळीतासाठी आलेला नाही. * ५ किलो साखर : ज्या बिगर सभासदांचा ऊस गळीतासाठी आलेला आहे. साखरेचा दर प्रतिकिलो २० रुपये निश्चित करण्यात आला आहे. स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणावी. आवश्यक कागदपत्रांशिवाय साखर दिली जाणार नाही. साखर वाटप सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत संबंधित गट कार्यालयांमध्ये होणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या जवळच्या ठिकाणी साखर उपलब्ध करून देण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या गट कार्यालयाशी किंवा शेती कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून साखर वाटपाचे ठिकाण निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपलाच ऊस आपल्याच कारखान्याला घाला! किसन वीर आणि खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याला घालून सहकार्य करावे, असे आवाहन प्रमोद शिंदे यांनी केले. तसेच ना. मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील आणि कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलेला शब्द, आठ वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेले साखर वाटप आणि दिवाळीच्या सणात मिळणारा गोडवा यामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
जाहिरात / Advertisement
Sabale patil construction
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार