भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त साताऱ्यात आठवडाभर विविध उपक्रमांची पर्वणी!

११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह; १५ नोव्हेंबरला गौरव दिनाचा मुख्य सोहळासातारा, दि. १२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती...

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त साताऱ्यात आठवडाभर विविध उपक्रमांची पर्वणी!

११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह; १५ नोव्हेंबरला गौरव दिनाचा मुख्य सोहळा

सातारा, दि. १२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

या सप्ताहांतर्गत १३ नोव्हेंबर रोजी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, पीएम जनमन, न्यूक्लियस बजेट, महिला बचत गट आणि कृषी योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना लाभवाटप व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता, दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी जिल्हा, तालुका व मंडळ स्तरावरील शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात येईल. यावेळी पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, समाजसेवक आणि आदिवासी मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

१६ नोव्हेंबर रोजी आधार दुरुस्ती, वनपट्टेधारक लाभ, शेतकरी नोंदणी व पीकविम्यासाठी विशेष सेवा शिबिरे भरविण्यात येतील. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी, सिकलसेल जनजागृती व माता-बाल पोषण मार्गदर्शन, तर १८ नोव्हेंबर रोजी कौशल्य विकास, रोजगार, जात वैधता आणि आर्थिक साक्षरता याविषयी मार्गदर्शन करून सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.

सप्ताहादरम्यान आदिवासीबहुल भागांमध्ये शोभायात्रा, लोककला सादरीकरण आणि क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार