झाडेच निसर्गाची खरी मशाल; वृक्षतोड थांबवा!

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा सरकार आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
झाडेच निसर्गाची खरी मशाल; वृक्षतोड थांबवा!

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा सरकार आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश

प्रतिनिधी | सातारा

“सरकार काय आभाळातून पडलंय का? तुम्ही-आम्हीच त्यांना निवडून देतो ना! आम्ही इतर कामांमध्ये बोलतो का? आमचा मुद्दा एवढाच आहे की, तुम्हाला कुठे दिवे लावायचे असतील, तर खुशाल लावा. मात्र, झाड हाच मुळात मूळ दिवा आहे, तीच खरी मशाल आहे. त्याला हात लावू नका!” अशा परखड शब्दांत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकार आणि प्रशासनाला वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून स्पष्ट संदेश दिला आहे.

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीसाठी सातत्याने आग्रही भूमिका घेणारे सयाजी शिंदे यांनी विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या प्रक्रियेत निसर्गाचा आणि पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामे करताना पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही लक्षात घ्यावी, असे आवाहन त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले आहे. रस्ते, दिवे आणि अन्य सुविधा निर्माण करताना जुन्या वृक्षांचे महत्त्व दुर्लक्षित करू नये, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

सयाजी शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे वृक्षतोड आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, त्यांच्या भूमिकेची पर्यावरणप्रेमींकडून दखल घेतली जात आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार