१८० वर्षांच्या वडूथ–वाढे ऐतिहासिक पुलांशी खेळ नको! अवजड वाहतूक रोखा, अन्यथा NHAI चे काम बंद पाडू – मदन साबळे यांचा इशारा; बंद म्हणजे बंदच!

वडूथ : सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वडूथ आणि वाढे येथील सुमारे १८० वर्षे जुने ऐतिहासिक पूल अवजड वाहतुकीच्या विळख्यात सापडले आहेत. अवजड वाहतुकीवर निर्बंध...

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
१८० वर्षांच्या वडूथ–वाढे ऐतिहासिक पुलांशी खेळ नको! अवजड वाहतूक रोखा, अन्यथा NHAI चे काम बंद पाडू – मदन साबळे यांचा इशारा; बंद म्हणजे बंदच!

वडूथ : सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वडूथ आणि वाढे येथील सुमारे १८० वर्षे जुने ऐतिहासिक पूल अवजड वाहतुकीच्या विळख्यात सापडले आहेत. अवजड वाहतुकीवर निर्बंध लागू असतानाही जड ट्रक आणि इतर वाहनांची ये-जा सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नवीन पूल तयार होईपर्यंत वडूथ आणि वाढे या दोन्ही ऐतिहासिक पुलांवरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी, ही मागणी सातत्याने करूनही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने मदन साबळे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.


२०१६ मधील दुर्घटनेचा अनुभव विसरू नका!


२०१६ मध्ये वडूथ येथील ऐतिहासिक पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी पुलाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांच्या माध्यमातून पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. पूल बंद असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने सुमारे २५ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. हा त्रास नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे.


आज वडूथ आणि वाढे या दोन्ही पुलांवर अवजड वाहनांचा भार पडत असताना प्रशासनाने पुन्हा अशाच दुर्घटनेची वाट पाहायची का? या दोन्ही पुलांचे नुकसान झाले किंवा एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदारी कोण घेणार? जीवितहानी झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजच खबरदारी घ्या, अशी मागणी साबळे यांनी केली.


खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचेही सहकार्य


वडूथ आणि वाढे परिसरातील ऐतिहासिक वारसा तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांनी यापूर्वी पाठपुरावा आणि सहकार्य केले आहे. तसेच महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या प्रश्नासाठी पाठपुरावा केला आहे. जनतेच्या अडचणी आणि विकासकामांच्या प्रश्नांमध्ये दोन्ही राजे वेळोवेळी सहकार्य करत असतात. ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवणे हा महत्त्वाचा विषय असून, या प्रश्नातील सहकार्याबद्दल मदन साबळे यांनी दोन्ही राजांचे आभार व्यक्त केले.


NHAI चे १०० पानी पत्र; मग दोन्ही पुलांवर अवजड वाहतुकीचा अट्टहास कशासाठी?


NHAI कडून या ऐतिहासिक पुलांच्या धोकादायक स्थितीसंदर्भात सुमारे १०० पानी पत्र देण्यात आल्याचे साबळे यांनी सांगितले. वडूथ आणि वाढे या दोन्ही पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना अवजड वाहतूक सुरू ठेवण्याचा आग्रह कशासाठी? पूल सुरक्षित असल्याचा दावा केला जात असेल, तर दोन्ही पुलांचा अधिकृत तांत्रिक तपासणी अहवाल आणि भारवहन क्षमता जनतेसमोर मांडावी. केवळ तोंडी आश्वासन देऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


नवीन पूल होईपर्यंत पर्यायी मार्ग वापरा!


आमची मागणी स्पष्ट आहे. वडूथ आणि वाढे या दोन्ही ठिकाणी नवीन पूल तयार होईपर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. यासाठीच आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. मग जुन्या ऐतिहासिक पुलांवर पुन्हा अवजड ट्रक आणि जड वाहनांचा भार टाकण्याची गरज काय? पर्यायी मार्ग उपलब्ध असताना दोन्ही पुलांवर अवजड वाहतुकीचा आग्रह कशासाठी? ही मागणी कोणाच्या विरोधासाठी नसून नागरिकांचे जीव आणि ऐतिहासिक वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी आहे.


वाढे फाट्यावरील पार्किंग आणि हाइट बॅरिअरचा प्रश्न


वाढे फाटा परिसरातील दुकानांसमोर होणाऱ्या अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित दुकानदारांनी स्वतःची पार्किंग व्यवस्था करून प्रशासनाला सहकार्य करावे. हाइट बॅरिअरमुळे व्यवसायात अडचणी येत असतील, तर त्यावर पर्यायी उपाय काढता येतील. मात्र, व्यवसायाच्या सोयीसाठी वडूथ आणि वाढे येथील ऐतिहासिक पुलांची सुरक्षितता आणि नागरिकांचे जीव धोक्यात घालता येणार नाहीत.


तुम्ही व्यवसाय करून पैसे कमवा, त्याला आमचा विरोध नाही; पण तुमच्या व्यवसायाच्या सोयीसाठी आम्ही माणसांचे जीव धोक्यात घालू देणार नाही. अपघातात गेलेला जीव पुन्हा परत येत नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे साबळे यांनी स्पष्ट केले.


२०१८ च्या आंदोलनाची आठवण ठेवा; बंद म्हणजे बंदच!


प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर २०१८ मध्ये केलेले आंदोलनही लक्षात ठेवावे. वडूथ आणि वाढे या दोन्ही ऐतिहासिक पुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बंद म्हणजे बंदच! नवीन पूल तयार होईपर्यंत दोन्ही पुलांवरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गानेच वळवली पाहिजे.


पोलीस अधीक्षक साहेबांनी पुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवजड वाहतूक नियंत्रणासाठी काढलेल्या सूचनांचा उद्देश सर्व नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवणे हा आहे. या सूचना कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नसून सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी. वाहतूक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणाचेही पाठबळ मिळता कामा नये.


NHAI चे काम बंद पाडण्याचा इशारा!


वडूथ आणि वाढे येथील ऐतिहासिक पूल कोणत्याही परिस्थितीत नष्ट होऊ देणार नाही. दोन्ही पुलांवरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, दिशादर्शक फलक, रात्री दिसणारे ब्लिंकर्स आणि प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था तातडीने करावी. निर्बंध केवळ कागदावर नकोत, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे.


प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास संबंधित ठिकाणी NHAI चे काम लोकशाही मार्गाने बंद पाडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मदन साबळे यांनी दिला.


विकासाला आमचा विरोध नाही; मात्र ऐतिहासिक वारसा नष्ट करून विकास नको! वडूथ आणि वाढे येथील दोन्ही ऐतिहासिक पूल जतन करा, नवीन पूल बांधा आणि तोपर्यंत पर्यायी मार्गाने अवजड वाहतूक वळवा. १८० वर्षांचा ऐतिहासिक वारसा आणि नागरिकांचे जीव धोक्यात घालू नका. दुर्घटना घडण्याची वाट पाहण्यापेक्षा आजच निर्णय घ्या. दोन्ही पूल वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार, हीच आमची ठाम भूमिका आहे!


— मदन साबळे

भाजपा युवा मोर्चा सचिव, सातारा

म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार