पुण्यतिथीच्या दिवशीच यशवंतराव चव्हाणांचे विस्मरण!

पोवई नाक्यावरील पुतळ्याला साधा पुष्पहारही नाही; सातारकरांमधून तीव्र संताप

फॉन्ट साइज:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
पुण्यतिथीच्या दिवशीच यशवंतराव चव्हाणांचे विस्मरण!

पोवई नाक्यावरील पुतळ्याला साधा पुष्पहारही नाही; सातारकरांमधून तीव्र संताप

सातारा, दि. २५ नोव्हेंबर : 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनीच सातारा शहरात त्यांच्या स्मृतींची उपेक्षा झाल्याचे चित्र समोर आले. शहराच्या मध्यवर्ती पोवई नाका येथील त्यांच्या पुतळ्याला लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून साधा पुष्पहारही अर्पण करण्यात आला नसल्याचे दिसून आल्याने सातारकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत आणि देशाच्या राजकारणात ऐतिहासिक योगदान दिले. सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी दूरदृष्टीने काम केले. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनाने मात्र पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राजकीय भाषणांमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र, प्रत्यक्ष अभिवादनाची वेळ आली असताना पोवई नाक्यावरील पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला जात नसेल, तर या विचारांच्या वारशाचे नेमके जतन कोण करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयातच अशी परिस्थिती निर्माण होणे ही निश्चितच चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुतळ्याची ही अवस्था लक्षात येताच जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजीही व्यक्त केली.

महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरत्या मर्यादित राहू नयेत. त्यांच्या विचारांचा सन्मान कृतीतून दिसला पाहिजे. पोवई नाका येथील पुतळ्याला महत्त्वाच्या स्मृतिदिनी नियमितपणे अभिवादन केले जाईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने करावी, अशी मागणी सातारकरांकडून होत आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार