रोहित सावंत यांची भाजप युवा मोर्चाच्या सातारा लोकसभा सरचिटणीसपदी नियुक्ती

रोहित सावंत यांची भाजप युवा मोर्चाच्या सातारा लोकसभा सरचिटणीसपदी नियुक्ती जिहे गावच्या सुपुत्रावर संघटनात्मक जबाबदारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सातारा, प...

फॉन्ट साइज:
रोहित सावंत यांची भाजप युवा मोर्चाच्या सातारा लोकसभा सरचिटणीसपदी नियुक्ती
रोहित सावंत यांची भाजप युवा मोर्चाच्या सातारा लोकसभा सरचिटणीसपदी नियुक्ती जिहे गावच्या सुपुत्रावर संघटनात्मक जबाबदारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सातारा, प्रतिनिधी : जिहे (ता. जि. सातारा) येथील रोहित सुनील सावंत यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सातारा लोकसभा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक म्हणून रोहित सावंत यांची ओळख आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर सातारा लोकसभा मतदारसंघात युवा मोर्चाची संघटना अधिक मजबूत करणे, युवकांना पक्षाच्या संघटनेशी जोडणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढविणे, यासाठी सावंत यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. युवकांचे संघटन मजबूत करून पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिहे गावासह परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. रोहित सावंत यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
स

संपादक मंडळ / Editor Desk

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित समाचार