भक्तीचा जागर! वडुथमध्ये उद्या श्री जोतिबाच्या मानाच्या सासनकाठीचे आगमन

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमणार; भाविकांना दर्शनाची संधी

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
भक्तीचा जागर! वडुथमध्ये उद्या श्री जोतिबाच्या मानाच्या सासनकाठीचे आगमन

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमणार; भाविकांना दर्शनाची संधी

वडुथ, प्रतिनिधी : 

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थानाची भक्तीपरंपरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपत श्री जोतिबाच्या मानाच्या सासनकाठीचे आगमन उद्या शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी मौजे वडुथ, ता. सातारा येथे होणार आहे. सकाळी ठीक १०.३० वाजता बँक ऑफ इंडिया शाखा, वडुथ शेजारी सासनकाठीचे आगमन होणार आहे.

श्री जोतिबा देवस्थानाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्री जोतिबांनी रत्नासूर राक्षसाचा वध करून परिसरातील जनतेचे रक्षण केले. श्री जोतिबा हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त दैवी शक्तीचे स्वरूप असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी डोंगरावरील श्री जोतिबा मंदिराचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण असून, सन १७३० मध्ये राणोजी शिंदे यांनी मंदिराची उभारणी केल्याचा ऐतिहासिक उल्लेख आढळतो.

श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत उंच, आकर्षक सजावट केलेल्या सासनकाठ्यांची मिरवणूक हे प्रमुख आकर्षण असते. गुलालाची उधळण, हलगीचा निनाद आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. सासनकाठी ही केवळ धार्मिक प्रतीक नसून श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा मानाचा वारसा मानली जाते.

गतवर्षीप्रमाणे यंदाही वडुथमध्ये या मानाच्या सासनकाठीचे आगमन होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मंगलमय प्रसंगी वडुथसह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री जोतिबाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जोतिबाच्या नावानं चांगभलं!


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या