दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चिन्मय कुलकर्णी यांचा पुढाकार
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चिन्मय कुलकर्णी यांचा पुढाकार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चिन्मय कुलकर्णी यांचा पुढाकार
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांच्या १५ ऑक्टोबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केला.
महाराष्ट्रातील विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून कुलकर्णी यांनी हे आर्थिक योगदान दिले. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिन्मय कुलकर्णी यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ आनंदोत्सव साजरा न करता समाजातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी योगदान देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजहिताचा संदेश देण्यात आला.