‘किसन वीर’च्या दिवाळी साखर वाटपास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!

व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांची माहिती; सभासद व बिगर सभासदांना दिलासावाई, दि. ९ नोव्हेंबर : किसन वीर आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसह बिगर सभासदा...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
‘किसन वीर’च्या दिवाळी साखर वाटपास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!

व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांची माहिती; सभासद व बिगर सभासदांना दिलासा

वाई, दि. ९ नोव्हेंबर : किसन वीर आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसह बिगर सभासदांना दिवाळीनिमित्त करण्यात येणाऱ्या साखर वाटपाला आता १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी साखर वाटपाची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही सभासदांना विविध अडचणींमुळे साखर घेता आली नसल्याने त्यांच्या मागणीनुसार संचालक मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना प्रमोद शिंदे म्हणाले की, नामदार मकरंदआबा पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. तसेच को-जनरेशन आणि डिस्टिलरी प्रकल्पांचे उत्पादनही सुरू झाले आहे.

मकरंदआबांनी जाहीर केल्याप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही जणांना अडचणींमुळे निर्धारित मुदतीत साखर घेता आली नाही. त्यामुळे गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर ते शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत साखर वाटपासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या सभासद व बिगर सभासदांनी अद्याप दिवाळीची साखर घेतलेली नाही, त्यांनी कारखान्याच्या कामकाजाच्या वेळेत किसन वीर व खंडाळा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरून आपली साखर घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी क्षणिक भुलथापांना बळी न पडता आपला संपूर्ण परिपक्व ऊस किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यांना गाळपासाठी द्यावा, असे आवाहन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने प्रमोद शिंदे यांनी केले आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या