मतदान हा अधिकारासोबतच कर्तव्यही; डॉ. स्मिता जाधव यांचे आवाहन
पुण्यात मतदानाचा हक्क बजावत पदवीधर व शिक्षक मतदारांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहन सातारा, दि. २३ : लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी...
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
पुण्यात मतदानाचा हक्क बजावत पदवीधर व शिक्षक मतदारांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहन
सातारा, दि. २३ : लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी पुणे येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्यही आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. सर्व पदवीधर व शिक्षक बंधू-भगिनींनी आवर्जून मतदान करून आपल्या मताधिकाराचा वापर करावा आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी केले.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला महत्त्व आहे. नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून आपल्या पसंतीचे प्रतिनिधित्व निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाबाबत जागरूक राहून आपल्या कर्तव्याची पूर्तता करावी, असा संदेशही डॉ. जाधव यांनी दिला.