सातारा : दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता निर्माण व्हावी, तसेच पशुधनाचे संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, या उद्देशाने नागठाणे परिसरातील शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा दत्त नागरी पतसंस्थेचे चेअरमन बाळकृष्ण कृष्णा साळुंखे (नाना), निवृत्त मेजर व ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन साळुंखे (काका), विद्यमान पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे पाटील, पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नेवसे मॅडम, नागठाणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बोडरे, नागठाणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, वर्धन ॲग्रोचे संचालक अविनाश साळुंखे, नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष गोरखनाथ यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय साळुंखे यांच्यासह चंद्रकांत महाडिक, दत्तात्रय मोहिते, सुनील मोहिते, संजय पवार, दीपक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाला नागठाणे, गणेशवाडी, आष्टे, सासपडे आणि सोनापूर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरत असून पशुधन संवर्धनासाठी अशा योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.