शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!

शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा तातडीने प्रतिसाद; काही तासांत शासन निर्णय जारी

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!

शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा तातडीने प्रतिसाद; काही तासांत शासन निर्णय जारी

सातारा :

साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या पोवई नाका येथील शिवतीर्थाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दरे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवतीर्थाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला तातडीने प्रतिसाद देत अवघ्या काही तासांत निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत सातारा नगरपरिषदेला हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित अनुज्ञेय विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवतीर्थाच्या विकासकामांना आता आर्थिक बळ मिळाले आहे.

निधी मंजूर झाल्यानंतर सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी गटनेते अविनाश कदम, क्रीडा व सांस्कृतिक सभापती शंकर किर्दत, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक विजय देसाई, राजू गोरे, रविराज किर्दत, सुशांत महाजन, जयवंत भोसले, सुनीलकुमार भंडारी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने साताऱ्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निधीमुळे शिवतीर्थाच्या विकासाला गती मिळणार असून साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवात आणखी भर पडणार असल्याची भावना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी व्यक्त केली.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या