संगम माहुलीत त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य धार्मिक सोहळा; परवा दीपोत्सवाची पर्वणी!

शिवतांडव अघोरी नृत्य, त्रिपुरासुर दहन अन् महाआरतीने कृष्णा-वेण्णा संगम परिसर उजळणार

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
संगम माहुलीत त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य धार्मिक सोहळा; परवा दीपोत्सवाची पर्वणी!
प्रातिनिधिक छायाचित्र.

शिवतांडव अघोरी नृत्य, त्रिपुरासुर दहन अन् महाआरतीने कृष्णा-वेण्णा संगम परिसर उजळणार

सातारा :

सातारा तालुक्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या श्री क्षेत्र संगम माहुली येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कृष्णा-वेण्णा संगम परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, दीपोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.

सकल हिंदू समाज कृष्णाघाट पंचक्रोशी, सद्गुरू ब्रह्मचैतन्य सेवा मंडळ, शिवभक्त मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता विरेंद्र केंजळे प्रस्तुत ‘साज’ या सुगम संगीत कार्यक्रमाने होणार आहे. सायंकाळी ६ वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी मानवंदना अर्पण करण्यात येणार असून, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई आणि दिव्यांच्या आरासीत संगम परिसर उजळून निघणार आहे.

सायंकाळी ७ वाजता श्री शिवतांडव अघोरी नृत्य सादर होणार असून, ७.२० वाजता त्रिपुरासुर दहनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्री काशी विश्वेश्वर तसेच श्री कृष्णा-वेण्णा मातेची भव्य महाआरती व नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. रात्री ८ ते ९.३० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संगम माहुली येथे भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या