सोशल मीडियावरील प्रयत्नांना यश; बेपत्ता आदर्श कांबळे ठाण्यात सुखरूप सापडला!

आसगावकरांसह जिल्हाभरातून मदतीचा ओघ; शोधकार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभारआसगाव, प्रतिनिधी : मौजे आसगाव (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेला आदर्श शैलेश कांबळे ह...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
सोशल मीडियावरील प्रयत्नांना यश; बेपत्ता आदर्श कांबळे ठाण्यात सुखरूप सापडला!

आसगावकरांसह जिल्हाभरातून मदतीचा ओघ; शोधकार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार

आसगाव, प्रतिनिधी :

मौजे आसगाव (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेला आदर्श शैलेश कांबळे हा विद्यार्थी ठाणे येथे सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आदर्शला शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, त्याला घरी आणण्यासाठी त्याचे कुटुंबीय ठाणे येथे रवाना झाले आहेत.

आदर्श बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणेसह ग्रामस्थ, नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याचे छायाचित्र आणि माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती. अनेकांनी आपल्या परीने माहिती पोहोचवून शोधकार्यात सहकार्य केले.

या संपूर्ण शोधमोहीमेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तसेच सोशल मीडियावरून माहिती प्रसारित करून मदतीचा हात देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

एका मुलाच्या शोधासाठी संपूर्ण समाज एकवटला आणि माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला. या सामूहिक प्रयत्नांमुळे आदर्श सुखरूप सापडल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या