‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाला साताऱ्यात चालना; जिल्हा परिषद अध्यक्षांसह सीईओंना माहिती

प्रत्येक गावात ‘उद्योग विचार मंच’ स्थापन करण्याचा मानस; सर्व ग्रामपंचायतींना परिपत्रक काढण्याबाबत जिल्हा परिषदेकडे विनंती

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Live Maharashtra 24
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाला साताऱ्यात चालना; जिल्हा परिषद अध्यक्षांसह सीईओंना माहिती
प्रत्येक गावात ‘उद्योग विचार मंच’ स्थापन करण्याचा मानस; सर्व ग्रामपंचायतींना परिपत्रक काढण्याबाबत जिल्हा परिषदेकडे विनंती सातारा : ग्रामीण भागात उद्योजकतेची संस्कृती रुजवून गावागावांत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (MACCIA) यांच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या अभियानाची सातारा जिल्ह्यात माहिती देण्यात आली. प्रत्येक गावात ‘उद्योग विचार मंच’ स्थापन करून स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण भागातील युवकांना उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. मंत्रालयात अभियानासाठी सामंजस्य करार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘गाव तिथे उद्योजक’ या संकल्पनेअंतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये ग्रामीण भागाचा सहभाग वाढविण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. ग्रामीण भागातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, नवउद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे यांना अभियानाची माहिती सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. प्रियाताई शिंदे यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाची माहिती देण्यात आली. यावेळी अभियानाची पुस्तिका भेट देण्यात आली. प्रत्येक गावामध्ये ‘उद्योग विचार मंच’ स्थापन करून स्थानिक युवकांना उद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शन करणे, नव्या व्यावसायिक संधी निर्माण करणे आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणे याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे सातारा जिल्हाध्यक्ष मयूर अशोक मोरे, कराड तालुका अध्यक्षा श्रीमती माळी, कोरेगाव तालुका अध्यक्षा सौ. आरती साबळे आणि सातारा जिल्हा बँकिंग कोऑर्डिनेटर प्रमोद मोरे उपस्थित होते. सीईओ यशनी नागराजन यांना विनंतीपत्र सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. यशनी नागराजन यांची महाराष्ट्र चेंबरच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष मयूर अशोक मोरे यांनी भेट घेऊन ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ‘उद्योग विचार मंच’ स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेने सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली. तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या (BDO) माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या अभियानासंदर्भात परिपत्रक काढण्यात यावे, अशी मागणी करणारे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले. या माध्यमातून अभियानाची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवून स्थानिक उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनाही पुस्तिका भेट जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश घुले यांचीही स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाची माहिती व पुस्तिका देण्यात आली. यावेळी आरबीआय कोऑर्डिनेटर प्रमोद मोरे आणि महाराष्ट्र चेंबरचे सातारा जिल्हाध्यक्ष मयूर मोरे उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवकांच्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देणे, स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि गावपातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘गावागावांत उद्योजक घडवूया, स्थानिक रोजगार वाढवूया आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला नवी गती देऊया!’ या संकल्पनेतून ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र चेंबरच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
जाहिरात / Advertisement
Mayur more
म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या