हिंदी कलाकारांना डोक्यावर, मराठी ज्येष्ठ कलाकारांना मात्र मागे; सुबोध भावेंचा संताप!

कलाकारांच्या सन्मानातील भेदभावावर स्पष्ट भूमिका; ‘प्रत्येकाला योग्य आदर मिळायलाच हवा’

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
हिंदी कलाकारांना डोक्यावर, मराठी ज्येष्ठ कलाकारांना मात्र मागे; सुबोध भावेंचा संताप!

कलाकारांच्या सन्मानातील भेदभावावर स्पष्ट भूमिका; ‘प्रत्येकाला योग्य आदर मिळायलाच हवा’

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि गुणी कलाकारांना अपेक्षित सन्मान न देता हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना अधिक महत्त्व दिले जात असल्याच्या प्रकारावर अभिनेते सुबोध भावे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले म्हणून एखाद्या कलाकाराला डोक्यावर घेतले जाते, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना मागे उभे राहावे लागते, ही बाब संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मेहक अंकर यांच्या पॉडकास्टमधील मुलाखतीत सुबोध भावे यांनी मराठी आणि हिंदी कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीतील फरकावर आपले मत मांडले. एखाद्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकाराला विशेष मान दिला जातो; मात्र मराठी चित्रपटसृष्टीत चार दशके योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला गर्दीत स्वतःची जागा शोधावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही अत्यंत प्रतिभावान असून त्यांच्या योगदानाचा आणि अनुभवाचा आदर होणे गरजेचे आहे. कलाकाराने कोणत्या भाषेतील चित्रपटात काम केले, यापेक्षा त्याचे कलाक्षेत्रातील योगदान आणि ज्येष्ठता महत्त्वाची असली पाहिजे, असा ठाम संदेश भावे यांनी दिला.

“प्रत्येकाचा आपापला सन्मान असतो. तो सन्मान द्यायला हवा. जिथे यथोचित सन्मान दिला जात नाही, तिथे प्रचंड राग येतो,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सुबोध भावे यांच्या या वक्तव्यामुळे मराठी कलाकारांना मिळणारा मान-सन्मान, मराठी चित्रपटसृष्टीचे योगदान आणि प्रादेशिक कलाकारांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या