पाणीटंचाईची झळ कायम! सातारा जिल्ह्यातील ५९ गावे, ३२२ वाड्यांना ५२ टँकरचा आधार

७९ हजार ६४५ नागरिकांसह ६४ हजार ९४७ पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठासातारा, दि. १२ : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता काय...

फॉन्ट आकार:
जाहिरात / Advertisement
Google AdSense Responsive Ad Unit
(Ad ID: 7892341209 - LiveMaharashtra24.com Slot)
पाणीटंचाईची झळ कायम! सातारा जिल्ह्यातील ५९ गावे, ३२२ वाड्यांना ५२ टँकरचा आधार

७९ हजार ६४५ नागरिकांसह ६४ हजार ९४७ पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

सातारा, दि. १२ : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता कायम असून, ५९ गावे आणि ३२२ वाड्यांमधील ७९ हजार ६४५ नागरिकांसह ६४ हजार ९४७ पशुधनासाठी प्रशासनाकडून ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या ५२ टँकरमध्ये एका शासकीय आणि ५१ खासगी टँकरचा समावेश आहे. या टँकरसाठी १०९.७२ खेपांना मंजुरी देण्यात आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने ११ विहिरी आणि १० बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.

माण तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक असून, ४५ गावे आणि २६९ वाड्यांमधील ६४ हजार ४५४ नागरिक व ५८ हजार पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

खटाव तालुक्यातील ११ गावे आणि ५१ वाड्यांमधील १३ हजार ४१७ नागरिक व ६ हजार ६६७ पशुधनासाठी सात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

फलटण तालुक्यातील तीन गावे आणि दोन वाड्यांमधील १ हजार ७७४ नागरिक व २८० पशुधनासाठी एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.


म

मुख्य संपादक (Administrator)

अधिकृत वार्ताहर (Verified Reporter)
मुख्य संपादक (Editor-in-Chief) • पुणे विभाग

लाइव्ह महाराष्ट्र २४ मुख्य संपादकीय मंडळ. महाराष्ट्र व देशातील निष्पक्ष, निर्भीड आणि वेगवान पत्रकारितेसाठी कटिबद्ध.

संबंधित बातम्या