LIVE महाराष्ट्र 24 दैनिक आवृत्ती (Daily Edition)
शेअर करा स्वतंत्र टॅब आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

‘रचना २०२६’चे साताऱ्यात भव्य बांधकाम प्रदर्शन; २६ नोव्हेंबरपासून चार दिवस पर्वणी!

सातारा पोलीस परेड ग्राउंडवर १०० स्टॉल्स; बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, गृहसंकल्पना आणि गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली
‘रचना २०२६’चे साताऱ्यात भव्य बांधकाम प्रदर्शन; २६ नोव्हेंबरपासून चार दिवस पर्वणी!
‘रचना २०२६’चे साताऱ्यात भव्य बांधकाम प्रदर्शन; २६ नोव्हेंबरपासून चार दिवस पर्वणी!
सातारा पोलीस परेड ग्राउंडवर १०० स्टॉल्स; बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, गृहसंकल्पना आणि गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखालीसातारा : बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन बांधकाम साहित्य, आकर्षक गृहसंकल्पना आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीच्या संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ‘रचना २०२६’ हे भव्य बांधकाम प्रदर्शन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या वतीने २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडवर हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणाऱ्या या प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी आयोजकांनी https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor ही लिंक उपलब्ध करून दिली आहे.या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक स्कॅन इन्फ्रा प्रेसेस एलएलपी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कन्स्ट्रक्शन असोसिएट्स आहेत. तर उद्यान एलिव्हेटर्स, नवनिर्मिती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि परफेक्ट हाऊस प्रा. लि. यांनी सहप्रायोजकत्व स्वीकारले आहे.प्रदर्शनात सुमारे १०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, बिल्डर्सचे विविध प्रकल्प, किचन इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीज, आधुनिक बांधकाम साहित्य, स्विमिंग पूल, गार्डन आणि फिटनेस इक्विपमेंट्स यांसह विविध उत्पादने व सेवांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.स्वतःचे घर बांधण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी आधुनिक डिझाइन्स, नवीन बांधकाम साहित्य, अद्ययावत तंत्रज्ञान, किचन व गार्डनच्या आकर्षक संकल्पना आणि घरासाठी आवश्यक सुविधांची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. याशिवाय विविध सरकारी योजनांची माहिती, गृहकर्जाबाबत मार्गदर्शन आणि बांधकाम
व्यवसायाशी संबंधित पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.असोसिएशनचे सेक्रेटरी निलेश शिंदे यांनी सांगितले की, स्वतःचे घर शोधणाऱ्या तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेच्या स्थापनेला ३६ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने सातारा शहरासह परिसरातील बांधकाम व्यवसायाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या प्रदर्शनाला सातारा शहर, तालुका, जिल्हा तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.‘नफा ना तोटा’ या ध्येयाने आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिक, उद्योजक आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद घडवून आणून ग्राहकांना योग्य दरात दर्जेदार उत्पादने व सेवा उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.स्टॉल बुकिंगसाठी ९७६७०००६७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा baisatara.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यावेळी असोसिएशनचे माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, उपाध्यक्ष हर्षद बालबलकर, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर रामदास जगताप, संतोषकुमार जगताप यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.‘रचना २०२६’ हे प्रदर्शन केवळ बांधकाम साहित्याचे प्रदर्शन न राहता स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि गुंतवणुकीच्या संधींचे व्यासपीठ ठरणार आहे.
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 1