LIVE महाराष्ट्र२४
महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र
जनावरांच्या चाऱ्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत… साताऱ्यात दुष्काळाशी लढण्याची तयारी सुरू!
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आठ दिवसांत टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देशसातारा, दि. ...
जनावरांच्या चाऱ्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत… साताऱ्यात दुष्काळाशी लढण्याची तयारी सुरू!
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आठ दिवसांत टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देशसातारा, दि. २१ : संभाव्य पाणीटंचाई आणि जनावरांच्या चारा टंचाईचा सामना करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे मोफत वाटप, धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन, विंधन विहिरींची दुरुस्ती आणि तालुकानिहाय टंचाई आराखडे तयार करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत पाणीपुरवठा, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे मोफत वाटप करावे, पडीक क्षेत्रातही चारा उत्पादनाला चालना द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करताना पिण्याचे पाणी
आणि सिंचनाच्या गरजांना प्राधान्य द्यावे. पुढील आठ दिवसांत तालुकास्तरावर बैठका घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार टंचाई आराखडे तयार करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.नैसर्गिकरीत्या जिवंत पाण्याचे झरे उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजना राबवाव्यात. विंधन विहिरींची दुरुस्ती, आवश्यक यंत्रांची उपलब्धता आणि जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती यावरही भर देण्यात आला.टंचाई निवारणाची कामे केवळ कागदावर न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन कामांचा दर्जा आणि प्रगती तपासावी. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार धैर्यशील कदम, आमदार मनोज घोरपडे, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जलद वार्ता
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१
महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT