LIVE महाराष्ट्र 24 दैनिक आवृत्ती (Daily Edition)
शेअर करा स्वतंत्र टॅब आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांच्याकडून कौतुक!

सदिच्छा भेटीत शाळेच्या उत्कृष्ट निकालांची घेतली दखल; भविष्यात आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही
जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांच्याकडून कौतुक!
जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांच्याकडून कौतुक!
सदिच्छा भेटीत शाळेच्या उत्कृष्ट निकालांची घेतली दखल; भविष्यात आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाहीपणदरे (बारामती) : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवलेल्या आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी भिकोबानगर, पणदरे (ता. बारामती) येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा आणि महात्मा ज्योतिराव फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ भेट देऊन त्यांचे शिवस्वागत करण्यात आले.यावेळी आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी शाळेच्या शैक्षणिक कार्याची, विविध उपक्रमांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. शाळेचे उत्कृष्ट शैक्षणिक निकाल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेचे शिस्तबद्ध व नियोजनबद्ध व्यवस्थापन पाहून त्यांनी विशेष कौतुक केले.जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केलेली वेगळी ओळख निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थापक अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप सर, प्राचार्या स्वरांजली विनोद जगताप मॅडम तसेच शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेत असलेले कष्ट आणि मेहनत या शाळेच्या यशामागील महत्त्वाचे योगदान असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.शाळेच्या प्रगतीसाठी संस्थापक अध्यक्ष व संपूर्ण शिक्षकवृंद घेत असलेले परिश्रम, विद्यार्थ्यांच्या निकालातील सातत्य आणि शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबद्दल आमदारांनी समाधान व्यक्त केले. तसेच शाळेच्या भविष्यातील प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळणार आहे.याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप सर, प्राचार्या शिवमती स्वरांजली विनोद जगताप मॅडम, संजय भाऊ जगताप, डी. डी. जगताप, पिनू आण्णा जगताप, अनिल आण्णा जगताप, अतुल निंबाळकर, निलेश कोकरे, दिगंबर मुळीक, अमित कोकरे, धन्यकुमार जगताप आणि बापूराव गायकवाड गुरुजी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदारांच्या या सदिच्छा भेटीमुळे शाळेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 1