LIVE महाराष्ट्र 24 दैनिक आवृत्ती (Daily Edition)
शेअर करा स्वतंत्र टॅब आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

ऐतिहासिक शाकुंतलेश्वर मंदिरात भव्य दीपोत्सव; हजारो पणत्यांनी उजळला कृष्णाकाठ!

रामराजे छत्रपती आणि महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार असलेल्या मंदिरात २०१२ पासून दीपोत्सवाची परंपरा
ऐतिहासिक शाकुंतलेश्वर मंदिरात भव्य दीपोत्सव; हजारो पणत्यांनी उजळला कृष्णाकाठ!
ऐतिहासिक शाकुंतलेश्वर मंदिरात भव्य दीपोत्सव; हजारो पणत्यांनी उजळला कृष्णाकाठ!
रामराजे छत्रपती आणि महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार असलेल्या मंदिरात २०१२ पासून दीपोत्सवाची परंपरावडूथ : सातारा तालुक्यातील कृष्णाकाठावर वसलेल्या वडूथ येथील ऐतिहासिक श्री शाकुंतलेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भव्य दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला. श्रद्धा, इतिहास आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम या दीपोत्सवातून अनुभवायला मिळाला.वडूथ येथील श्री शाकुंतलेश्वर मंदिराला मराठा इतिहासाची महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी लाभली आहे. इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या New History of the Marathas, Volume II या ग्रंथातील नोंदीनुसार, २६ डिसेंबर १७४९ रोजी रामराजे (राजाराम द्वितीय) वडूथ येथे आले असता त्यांची महाराणी ताराराणी यांच्याशी श्री शाकुंतलेश्वर मंदिरात भेट झाली होती. पुढे ४ जानेवारी १७५० रोजी रामराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला. त्यामुळे या मंदिराला मराठा राजघराण्याच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वडूथ गाव धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा २०१२ पासून सुरू आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ, वडूथ यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम आज ग्रामस्थांच्या सहभागातून अधिक व्यापक होत आहे.मंडळ आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभागयंदाच्या दीपोत्सवाचे आयोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मंडळी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे परिश्रम घेत दीपोत्सव यशस्वी केला. पणत्यांची व्यवस्था, मंदिर परिसराची स्वच्छता, सजावट आणि नियोजनासाठी सर्वांनी मोलाचे योगदान दिले. हजारो पणत्या प्रज्वलित झाल्यानंतर मंदिराचा संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी
ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती.मंदिराच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी मंडळाचा पुढाकारश्री शाकुंतलेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा जतन करून मंदिराचे मूळ स्वरूप कायम राहावे, यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून पुरातत्त्व विभागाचे अधिकारी विलास वाहणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वासंदर्भातील नोंदी व माहिती मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. तसेच मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी शासनाकडून आवश्यक निधी मंजूर करून मिळावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व्हावे आणि हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावा, यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे.ऐतिहासिक वारसा आणि परंपरेचे जतनदीपोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा उपक्रम आहे. २०१२ पासून सुरू असलेली ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, ऐतिहासिक मंदिराचे महत्त्व सर्वांना समजावे आणि ग्रामस्थांमधील एकजूट कायम राहावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाचे राज्य यावे!दीपोत्सवाच्या या मंगलमय पर्वात परिसरावरील दुष्काळाचे सावट दूर व्हावे, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवीगार पिके डोलावीत, विहिरी व तलाव पाण्याने भरून जावेत आणि बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद नांदावा, अशी प्रार्थना श्री शाकुंतलेश्वर चरणी करण्यात आली. शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा, प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप प्रज्वलित व्हावा, हीच या दीपोत्सवामागील मंगल भावना आहे.श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हा दीपोत्सव अधिक उत्साहाने साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळलेले श्री शाकुंतलेश्वर मंदिर वडूथच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवून गेले.
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 1