LIVE महाराष्ट्र 24 दैनिक आवृत्ती (Daily Edition)
शेअर करा स्वतंत्र टॅब आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

सैनिक स्कूल साताऱ्यात सहावी, नववीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २ डिसेंबर अंतिम मुदत

सातारा, दि. १२ :सैनिक स्कूल सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठ...
सैनिक स्कूल साताऱ्यात सहावी, नववीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २ डिसेंबर अंतिम मुदत
सैनिक स्कूल साताऱ्यात सहावी, नववीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २ डिसेंबर अंतिम मुदत
सातारा, दि. १२ :सैनिक स्कूल सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी ३ नोव्हेंबर २०२६ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत आहे.इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर इयत्ता
नववीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय १३ ते १५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.इच्छुक पालकांनी निर्धारित मुदतीत आपल्या पाल्याचे ऑनलाइन अर्ज भरावेत. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, पात्रता निकष तसेच अर्जासंदर्भातील शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.अधिकृत संकेतस्थळ : https://exams.nta.nic.in/sainik-school-society/शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी पालकांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक स्कूल सातारा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 1