LIVE महाराष्ट्र 24 दैनिक आवृत्ती (Daily Edition)
शेअर करा स्वतंत्र टॅब आवृत्त्या स्टुडिओ
॥ श्री ॥
दैनिक आवृत्ती (Daily Edition)
LIVE महाराष्ट्र 24

LIVE महाराष्ट्र२४

महाराष्ट्राचे निर्भीड, निःपक्ष आणि विश्वासार्ह दैनिक वृत्तपत्र • सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
महाराष्ट्र शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र

शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!

शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा तातडीने प्रतिसाद; काही तासांत शासन निर्णय जारी
शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!
शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!
शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा तातडीने प्रतिसाद; काही तासांत शासन निर्णय जारी सातारा : साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या पोवई नाका येथील शिवतीर्थाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दरे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवतीर्थाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला तातडीने प्रतिसाद देत अवघ्या काही तासांत निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत सातारा नगरपरिषदेला हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित अनुज्ञेय विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवतीर्थाच्या विकासकामांना
आता आर्थिक बळ मिळाले आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी गटनेते अविनाश कदम, क्रीडा व सांस्कृतिक सभापती शंकर किर्दत, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक विजय देसाई, राजू गोरे, रविराज किर्दत, सुशांत महाजन, जयवंत भोसले, सुनीलकुमार भंडारी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण शिवतीर्थाच्या विकासासाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने साताऱ्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निधीमुळे शिवतीर्थाच्या विकासाला गती मिळणार असून साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवात आणखी भर पडणार असल्याची भावना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी व्यक्त केली.
जलद वार्ता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी सर्वात आधी LIVE महाराष्ट्र २४ वर
आपत्कालीन हेल्पलाईन: पोलीस ११२ • रुग्णवाहिका १०८ • अग्निशामक १०१ महिला १०९१ • बाल १०९८
A4 DIGITAL E-PAPER FORMAT
📞 संपर्क / जाहिरात: 9763477700
Developed with ❤️ by Kliqueit Logo Kliqueit
पान १ / 1