Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल आर्ट्स महाविद्यालयाच्या व्हिज्युअल आर्ट्स विभागातर्फे कला सफर प्रदर्शन भरवण्यात आले. कला आणि संस्कृतीच्या प्रवासाला मूर्त रूप देण्याचा हा एक प्रयत्न होता. व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या फोटोग्राफी आणि विविध लँडस्केप्सचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
फोटोग्राफी आणि लँडस्केप कार्यशाळा प्रा. वृषसेन मोहिते (फोटोग्राफी) यांनी आयोजित केली होती ज्यांनी कमी प्रकाशात आणि प्रतिमांच्या दृष्टीकोनातून प्रतिमा लँडस्केप बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि प्रा. तुषार मोलेश्वरी (लँडस्केप) ज्यांनी भारतीय इतिहासाचा विचार ऍक्रेलिक लँडस्केप माध्यमातून संजय गांधी उद्यान कान्हेरी गुंफा येथे प्रात्याक्षिकातून दिला.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी राजस्थान आणि उत्तराखंडचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. ज्यामध्ये त्यांना कलात्मक दृष्टीकोनातून स्थानांची माहिती करून प्रदर्शनासाठी उपयोगात आणली. राजस्थानच्या रॉयल पॅलेसेस आणि हरिद्वारच्या पवित्र मंदिरांपासून ते ग्रेट थार वाळवंट आणि मसुरीच्या टेकड्यांपर्यंत विद्यार्थ्यांना प्रदर्शनासाठी प्रेरणादायी अशा अनेक गोष्टी समोर आल्या.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार काटकर सरचिटणीस ज्येष्ठ अॅड. अप्पासाहेब एस. देसाई कॅम्पस डायरेक्टर प्रा. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया क्लबच्या असोसिएशनमधील व्हिज्युअल आर्ट्स विभागाच्या वतीने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी अॅबस्ट्रॅक्ट आर्ट कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन डिझाईन आणि स्टोरी बोर्डिंग या विषयांवर मनोरंजक आणि माहितीपूर्ण टॉक शो आणि सेमिनार आयोजित करण्यात आले.
प्रा. प्रमोद शिरभावीकरांनी अप्लाइड आर्टच्या विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक सत्रात संवाद आणि माहिती डिझाइन तपशीलावर चर्चासत्र दिले. वर्तमानपत्रातील विविध प्रकारच्या जाहिरातींवर त्यांची चर्चा होती. जाहिरातींची मांडणी कला आणि चिन्हांचे घटक/तत्त्वे यांचे महत्त्व सांगितले. पंकज खलोदे यांनी स्क्रिबल आणि व्हिडिओ सादरीकरणासह स्टोरीबोर्डिंगची प्रक्रिया स्पष्ट केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Rupesh Adolikar