Breaking News
साखरखेर्डा ( वार्ताहर )
परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी पुर्ण केली असून मोसमी पाऊस पडल्यानंतरच खरीपाची पेरणी करणे योग्य ठरणार असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे .
साखरखेर्डा परिसरात ३ , ९ आणि १० जूनला वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला आहे . हा अवकाळी पाऊस काही भागातच पडल्याने आजही शेतकरी मोसमी पावसाची प्रतिक्षा करीत आहे . साखरखेर्डा भागातील गोरेगाव , उमनगाव , पांग्रीकाटे, सावंगी माळी , वडगावमाळी , सायाळा , शेंदुर्जन , जागदरी , आंबेवाडी या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली . काही भागात शेतातून पाणी वाहिले , तर काही ठिकाणी पाणी तुंबले होते . त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेती पेरणी योग्य करुन ठेवली . काही ठिकाणी कपाशीची लागवड सुध्दा केली आहे . दरवर्षी मोसमी पाऊस हा ७ जून नंतर येत असतो . परंतू पुर्वेकडील वारे जोरात वाहात असल्याने विजांच्या कडकडाटात पाऊस आला . या पावसामुळे मोसमी पावसाला विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन , मुग उडीद , तूर यांची पेरणी थांबविली आहे . मागील वर्षी अवकाळी पावसावर पेरणी केल्यामुळे प्रदिर्घ बखाड पडली होती . काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती . तर मूग आणि उडीद ही पीके उगवलीच नव्हती . मूग , उडीद यांचा पेरणी हंगाम निघून गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली होती . यावर्षी जमीनीत किमान ९ इंच ओल आल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी अधिकारी गणेश बंगाळे यांनी केले आहे . त्यामुळे सोयाबीन पेरणी थांबली आहे .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pradeep Chavan