Breaking News
मराठा इतिहास विश्वकोश निर्मितीसाठी प्रयत्नशील
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश अशोक कदम यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी अकरा वाजता परिषदेच्या वतीने त्यांचा आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासमवेत इतिहासासंदर्भात महत्वाच्या देवाण-घेवाणविषयीचा करार होत आहे. यात प्रामुख्याने मराठा इतिहासाच्या विश्वकोशाची निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राहणार आहे.
छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीजच्या सामग्री व हस्तलिखिते यांच्यावरील अभ्यासासाठी देवाणघेवाण त्यांचे डिजिटलायझेशन स्थानिक भाषेवर आधारित मराठा इतिहासावरील १० मोनोग्राफ प्रकाशित करणे संशोधन पद्धती तसेच स्त्रोत यांच्यावरील कार्यशाळेचे आयोजन मराठा इतिहासावरील स्थानिक परिसंवाद मोठ्या संशोधन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे ई-लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये सहभागी करणे तसेच ऑनलाइन व्याख्यानांची मालिका मराठी भाषा आणि मोडी लिपी ऐतिहासिक अर्थाने समजून घेणे आदी उपक्रम या अंतर्गत होणार आहेत.
अशाच प्रकारचा करार यापुढे ७ जानेवारी २०२३ रोजी धारवाड (कर्नाटक) येथील बहु-अनुशासनात्मक विकास संशोधन केंद्रासमवेत होणार आहे. डॉ. उमेश अशोक कदम यांचा केंद्राचे सदस्य सचिव वेदव्यास हुगुंड यांच्यासमवेत हा करार होईल. या करारानुसार स्थानिक इतिहास संशोधन विषयक प्रभावीपणे कार्य करण्यात येईल तसेच इतिहासाची नवी दालने अभ्यासक तसेच जनतेसाठी खुली करण्याचा हा एक प्रयत्न असेल असे डॉ. उमेश अशोक कदम यांनी याबाबत बोलताना सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra