Breaking News
अनघा भगरे एकनाथ पाटील देवेंद्र भुजबळ पंडित यादव आशिष राणे यांचाही सन्मान होणार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभिनयाच्या कुशल जोरावर दूरदर्शन चित्रपट नाट्य तसेच आपल्या आवाजाने अनेकांना त्यांनी थिरकवलं असे जेष्ठ अभिनेते संगीतकार नागेश मोरवेकर यांना या वर्षीचा एकता कला गौरव पुरस्कार जाहीर झाला असून कवयित्री कीर्ती पाटसकर मार्केटींग कन्सल्टंट अभिजित आळवे नृत्य के. शोभना उद्योग रवींद्र मर्ये समाजसेविका देवता मेत्री यांचा पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. एकता पुरस्काराची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी प्रकाश गणपत जाधव यांनी केली.
ज्येष्ठ अभिनेते नागेश मोरवेकर यांना एकता कला गौरव पुरस्कार अनघा भगरे - अभिनय (प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार) एकनाथ पाटील - साहित्य (कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार) कीर्ती पाटसकर (राजेश जाधव पुरस्कृत काशिनाथ गणपत कर स्मरणार्थ दया पवार स्मृती पुरस्कार) देवेंद्र भुजबळ - पत्रकारिता (सुनील खर्डीकर पुरस्कृत - चंद्रभागा गणपत खर्डीकर स्मरणार्थ नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार) आशिष राणे (रजनी बेनकर पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ जयंत पवार स्मृती पुरस्कार) के. शोभना - नृत्य (सुबल सरकार स्मृती पुरस्कार) रवींद्र मर्ये - उद्योग (प्रकाश पाटील पुरस्कृत प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार) अभिजित आळवे - मार्केटींग कन्सल्टंट (यशवंतराव - चव्हाण स्मृती पुरस्कार) डॉ. प्रागजी वाजा - वैद्यकीय (नितू मांडके स्मृती पुरस्कार) पंडित परमानंद यादव - संगीत (पंडित कुमार गंधर्व स्मृती पुरस्कार) अशोक होळकर - सरंक्षण (नंदकुमार गोखले स्मृती पुरस्कार) पूर्णिमा सुभाष शिंदे - शैक्षणिक (सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार) विजय सावंत (रत्नाबाई भिकाजी खरटमल पुरस्कृत माणिक भिकाजी स्मरणार्थ महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कार) संगीता कुलकर्णी साहित्य (उज्जय आंबेकर पुरस्कृत मधू आंबेकर स्मरणार्थ मृणाल गोरे स्मृती पुरस्कार) मनीषा केरकर - उद्योग (संत जनाबाई स्मृती पुरस्कार) आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री बाबुराव इंगळे (नितिन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार) रमेश घोरकना (संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार) देवता मंत्री (वैशाली बाळाराम कासारे स्मरणार्थ बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार) प्रकाश गुरव (स्मिता जाधव पुरस्कृत रमेश गणपत जाधव समरणार्थ बाबा आमटे स्मृती पुरस्कार) गजानन रेवडेकर (सिंधूताई सकपाळ स्मृती पुरस्कार) दीपक भारती (जयप्रकाश नारायण स्मृती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले. कवी अजय कांडर अभिनेते प्रमोद पवार हिंदी साहित्यिक रमेश यादव यांच्या निवड समितीने पुरस्कारांची निवड केली आहे. १४ जानेवारी २०२३ रोजी ४ वाजता गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे. असे एकताचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra