Breaking News
खेळ मांडियेला नवा कथासंग्रहात सामान्य माणसाचे
प्रतिबिंब!भाषा संवर्धन दिनी सचिन अहिर यांचे प्रतिपादन
मुंबई दि.२९: कथालेखक काशिनाथ माटल यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून खेळ मांडियेला नवा हा कथासंग्रह लिहिला असल्याने तो वाचकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिन भाऊ अहिर यांनी येथे अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केला.तर ज्येष्ठ लेखिका प्रतिमा जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना म्हणाल्या काशिनाथ माटल यांच्या अनेक कथांमध्ये काळाचे पाऊल उमटलेले दिसते.म्हणूनच हा कथासंग्रह कायम लोकांच्या स्मरणात राहील.
पुण्यातील संवेदना प्रकाशनने प्रकाशित केलेला आणि संघटनेचे जनसंपर्क प्रमुख तसेच ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांनी लिहिलेल्या खेळ मांडियेला नवा या चौथ्या कथासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी परेलच्या मनोहर मामा फाळके सभागृहात अध्यक्ष सचिन भाऊ अहिर आणि लेखिका प्रतिमा जोशी यांच्या हस्ते पार पडले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवडा पार पडला.त्या अंतर्गत हे पुस्तक प्रकाशन पार पडले.त्या अगोदर महिला मेळावा पार पडला.आमदार सचिन अहिर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष आणि संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
आमदार सचिनभाऊ अहिर पुढे म्हणाले काशिनाथ माटल यांच्या मराठी साहित्यातील यशाचाआम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. आजच्या लेखकांनी समाजभिमुख पिडीत वर्गाच्या वेदना साहित्यातून मांडणे काळाची गरज आहे.
ज्येष्ठ लेखिका प्रतिमा जोशी आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या
काशिनाथ माटल आपल्या सुबोध लेखनीतून वाचकाला शेवटच्या क्षणापर्यंत वाचनात खिळवून ठेवतात.पण त्यात ते कधीही प्रचारकीचा थाट आणू देत नाहीत ही त्यांच्या लेखनाची खासियत आहे.त्यांच्या ब-याच कथा सकारात्मक असल्या तरी त्या वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोवितात यातच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य दिसते.
अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि विविध संस्थांचे समोपदेशक डॉक्टर शरद सावंत म्हणाले भावभावनांचे गाणित कथांमधून मांडण्याचे अवघड काम काशिनाथ माटल करतांना दिसतात.
काशिनाथ माटल म्हणाले मी कधी कथा लेखनाला गोष्टी समाजत आलो नाही. समाजातील विवंचनाग्रस्त घटना किंवा व्यक्तिमत्त्वांनी स्वतःला माझ्या कडून व्यक्त होऊन घेतलंय.त्यातून माझी कथा आकारास येत गेलीय.
गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकात भाषा संवर्धनाचे महत्व विशद करताना सांगितले आजच्या लेखकांनी आपल्या कसदार साहित्यातून वाचक टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
सिन्नरचे लेखक किरण भावसार म्हणाले काशिनाथ माटल कथा लेखनात आणि व्यक्तीगत जीवनात व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन सारखी साधी आणि प्रामाणिक भूमिका जगत आले आहेत. ते जसे जगतात तसेच शब्दांत उतरतात.
आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे जी.बी.गावडे निवृत्ती देसाईअण्णा शशिर्सेकर आदीं पदाधिकारी उमरगा येथील समाजसेवक विजय जाधव या प्रसंगी उपस्थित होते.
या औचित्याने गेला पंधरवडा ग्रंथ प्रदर्शनाने भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न करण्यात आला.या उपक्रमाची समाप्ती महिला महिला हळदीकुंकू समारंभाने आणि पुस्तक प्रकाशनाने पार पडला. या प्रसंगी डॉक्टर शर्मा यांनी आपल्या भाषणात महिलांना आरोग्य विषयक जाणीवा निर्माण करून दिल्या.मराठी भाषा संवर्धन उपक्रम प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी आशा आसबे प्रियांका परब श्रावणी पवार आदींच्या पुढाकाराने पार पडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra