सुरुची सोसायटीमध्ये अभिमानास्पद वर्दीला दिला मानाचा सलाम!



भारतीय प्रजासत्ताकदिनाचा सोहळा आज ई क्र 28ब सुयोग सोसायटी अभ्युदय नगर येथे औचित्यपूर्ण समारोहात साजरा झाला.अहिल्या विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर कर्तव्य बजावत असलेले कर्नल विनय खानोलकर प्रादेशिक परिवहन विभागाचे माजी प्रमुख अधिकारी के. टी. गोलाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे वरीष्ठ अधिकारी अशोक लांडगे डॉ प्राग्जी वाझा काळाचौकी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच अभ्युदय नगरचे रहिवासी माजी सैनिक भरत सुगदरे ह्या अभिमानास्पद वर्दी धारण करणाऱ्या निवडक व्यक्तिमत्त्वाना सलामी देवून मानवंदना दिली.

यावेळी अहिल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत सराव केला.तर सोसायटीतील मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केली.

वेदश्री जाधव या बालगायिकेने गायिलेल्या वंदे मातरम् गीताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सादर केली.

वाहतूक शाखेचे अशोक लांडगे यांनी विद्यार्थ्याना नागरिकांना रस्ता सुरक्षा विषयक शपथ दिली.

तर गोलाणी सरांनी वाहतूक नियम पालन का करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तर कर्नल यांनी सैन्य दलात भरती होवून देशसेवेची संधी साधावी असे आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे औचित्यपूर्ण निवेदन केलं होतं भारदस्त आवाजात उमेश सावंत यांनी केलं होतं

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट