Breaking News
वोखार्ड हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेले विख्यात अस्थिव्यंग तज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.मुदित खन्ना यांच्या अभ्यासपूर्ण व्यासंगी व्याख्यान आणि अस्थिरोग विषयक विनामूल्य तपासणी शिबिराचे आयोजन काळाचौकी अभ्युदय नगरच्या महापालिका शाळेच्या सभागृहात जेष्ठ जायंट्स ग्रुप मुंबई वन च्या राबिया पटेल वोखार्ड चे प्रसाद निकम आणि शेखर छत्रे यांच्या वतीने विभागीय नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन सुप्रसिध्द समाजसेवक मुंबईचे माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
या शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी डॉ. वैशाली शेलार डॉ. प्रागजी वाझा काळाचौकी पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रवीण कूयेस्कर स्वराज्य फाउंडेशन चे संस्थापक उदय पवार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सातपुते दक्षिण मुंबई केटरिंग असोसिएशन सचिव नितीन कोलगे पोलीस अधिकारी जितेंद्र सावंत भारतीय कामगार सेनेचे सुनील कालेकर सदानंद गुरव राष्ट्रवादी चे युवा सचिव प्रतीक नांदगावकर यांची उपस्थिती लाभली.अभ्युदय नगर जेष्ठ नागरिक संघाचे जिवाजी परब जेष्ठ नागरिक संघ जिजामातानगर चे सोनू भालेकर आणि अन्य पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra