Breaking News
अहिल्या विद्यामंदिर प्राथमिक शाळेचा स्नेहबंध हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी काळाचौकी पोलीस स्टेशनचे अधिकारी शेख साहेब मोरे साहेब स्वाद केटरींगचे नितीन कोलगे आदर्श स्वराज्य चे संपादक उदय पवार पत्रकार कवी गुरुदत्त वाकदेकर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सातपुते आणि शेखर छत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शाळेतील लहान मुलांनी यावेळी अनेक नृत्य सादर केली.
श्रीविठ्ठल आणि ज्ञानेश्वर मुक्ताई यांचा भक्तिरसपूर्ण सादरीकरण घुमरा नृत्य असे अनेक नृत्यप्रकार सादर केले गेले.
यावेळी पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना पोलीस निरीक्षक शेख साहेबांनी केल्या आणि विदर्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी हम होंगे कामयाब हे गीत सादर केले.
अहिल्या शाळेचे संस्थापक आत्माराम मोरजकार यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत श्री कोलगे यांनी आदरणीय सुवासिनी मोरजकर मॅडम कृतिका मोरजकर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेचे संचालक प्रमोद मोरजकर यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागाचे कौतुक करून आभार व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाचे ओघावत्या आणि खुमासदार शैलीत आनंद आमरे सरांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra