"फॉर फ्युचर इंडिया' ने खारफुटी आणि सागरी जैवविविधता संरक्षण आणि स्वच्छतेसाठी राज्य सरकारसोबत केला सामंजस्य करार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "फॉर फ्युचर इंडिया" संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे आणि "मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार" यांनी दुसऱ्यांदा ठाणे व मुंबई भागातील खारफुटी आणि सागरी जैवविविधता संरक्षण आणि स्वच्छता मोहिमेसाठी (MoU) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामध्ये 'महाराष्ट्र वन विभाग व मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन' कडून ठाणे व मुंबई भागातील खारफुटी आणि सागरी जैवविविधता संरक्षण आणि स्वच्छता मोहिमेसाठीच्या मदतीचा मुद्धा स्पष्ट केला आहे. 

मागील वर्षी झालेल्या सामंजस्य करारामध्ये महाराष्ट्र वन विभाग व मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशनच्या मदतीने "फॉर फ्युचर इंडिया" संस्थेने वर्षभरात मिरा-भाईंदर पूर्व खाडी व पश्चिम खाडी बोरिवली येथील गोराई खाडी मालाड येथील मानोरी समुद्रकिनारी ३० वेळा कांदळवन स्वच्छता अभियान राबविले ज्यात ४४८० स्वयंसेवकांनी सहभाग घेत ९५००० किलोहून अधिक प्लास्टिक कचरा निर्माल्य काचेच्या बाटल्या व इतर कचरा काढला. ज्यामुळे कांदळवनाची वाढ होण्यास मदत झाली तर अनेक युवांना तसेच स्थानिकांना कांदळवनाचे महत्व पटवून देण्यास मदत मिळाली. 

यावेळी आदर्श रेड्डी - उपवनसंरक्षक (मँग्रोव्ह सेल) आणि सहसंचालक (मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन) लक्ष्मीकांत देशपांडे - वरिष्ठ व्यवस्थापक (गोदरेज अँड बॉयस इंडिया येथील मॅंग्रोव्हज) डॉ. शीतल पाचपांडे - डेप्युटी डायरेक्टर प्रोजेक्ट (मँग्रोव्ह फाउंडेशन) डॉ. मानस मांजरेकर - उपसंचालक संशोधन आणि क्षमता बांधणी (मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन) "फॉर फ्युचर इंडिया" संस्थेचे सचिव सिद्धेश कांबळे सह-संस्थापक ध्रुव कडारा वनाधिकारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. 

"या सामंजस्य कराराने खारफुटी आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्यास आणि स्वच्छता मोहिमेस योग्य चालना मिळेल. तसेच खारफुटी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल." असे संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे यांनी सांगितले आहे.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट