Breaking News
मुंबई दि.१४ :आजच्या आज दिल्ली एनटीसी होल्डींग कंपनीला मुंबईसह महाराष्ट्रातील गिरणी कामगारांच्या व्यथा लेखी पत्राद्वारे कळविण्यात येतील आणि दिल्ली वरुन येणा-या पैशातून कामगारांचा पगार प्रथम देण्यात येईल असे आश्वासन मु़बई एनटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाप्रबंधक कुणगुमा राजू यांनी आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळा दिले आहे.आश्वासनापूर्वी संतप्त गिरणी कामगारांनी जवळपास दोन-अडितासाचे घेराव मुख्य दालनात आंदोलन छेडले.त्या अगोदर बंद गिरण्या सुरु करा नाहीतर खूर्च्या खाली करा! चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यवस्थापनाला शासन झालेच पाहिजे! अशा कामगारांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आवाहन केल्या नुसार आज मुंबईतील चार गिरण्यांसह बार्शी अचलपूर येथील एनटीसी गिरण्यातील संतप्त कामगारांनी व्यवस्थानाला घेरावचे आंदोलन छेडले.
मागील गुरुवारी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहीर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील एनटीसी च्या चारी गिरण्यांवर कामगारांनी जोरदार ठिय्या आंदोलन छेडून केंद्र सरकारला जाग आणली होती.पण त्यावर कोणतेही सकारात्मक पाऊल उलण्यात आले नाही. त्यामूळे आज घेराव आंदोलन छेडण्यात आले.
संघटना नेत्यांच्या शिष्टमंडळाने एनटीसीचे नवीन महाप्रबंधक कुणगुमा राजू यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्या प्रसंगी एनटीसीचे वरिष्ठ डि.के.नासा जन.मॅनेजर के.सी.पवार आदि उपस्थित होते.
सर्वश्री खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष अण्णा शशिर्सेकर सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले की मुंबईतून जमीन विक्री अथवा अन्य मार्गाने येणारा पैसा मुंबईतील गिरण्यांच्या विकासावर करावा न्यायालयातील निर्णया प्रमाणे कामगारांना १०० टक्के पगार देण्यात यावा जमीन विक्रीतून मिळाले ल्या. कोट्यावधी रुपयातून गिरण्यांचे आधुनिकी करण्यात आले.परंतु त्याही गिरण्या चालविण्यात आल्या नाहीत हा व्यवस्थापनाचा बेदरकारीपणा आहे असा आरोप करुन शिष्टमंडळाने केंद्र सरकारने एनटीसी गिरण्या त्वरित सुरु केल्या नाहीत किंवा गेल्या पाच महिन्यांचा पगार त्वरीत देण्यात आला नाही तर संतप्त कामगारांमध्ये उद्रेक होईल असा सावधगिरीचा इशारा शिष्टमंडळाने शेवटी दिला आहे.आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटन सेक्रेटरींनी महत्त्वाचे सहकार्य केले.**
-काशिनाथ माटल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra