Breaking News
कौटुंबिक सोहळा जिजामाता नगरच्या रहिवाशांचा!!*
प्रतीक नांदगावकर आणि सहकारी अतुल कुरणकर संजय गोसावी यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि सचिन कामतेकर यांच्या कुशल संयोजनाने नटलेला खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम कष्टकऱ्यांच्या भूमीत जिजामाता नगरच्या वसाहतीत रंगला!
संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचा शुभारंभ फलक अनावरण करून केला.
या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी फेम अभिनेत्री दीप्ती धोत्रे काळाचौकी ची अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नांगरे पाटील ज्या आज अभिनयासोबत राजकारणातही युवा नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांचीही विशेष उपस्थिती ह्या कार्यक्रमासाठी लाभली होती.
राष्ट्रवादी चे नेते विजय झांजुरे अरविंद केणी आणि पत्रकार शेखर छत्रे आणि महाराष्ट्र बाजार पेठेचे कौतिक दांडगे उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान पोलीस कर्मचारी गोरे यांची कन्या खुशी या अष्टपैलू बाल कलाकाराचा तसेच अनेक स्थानिक कलाकार आणि मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra