Breaking News
मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून ४८ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.
लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एस. पठाण एस. एस. देशपांडे जिल्हा न्यायाधीश डी. एस. दाभाडे न्यायाधीश ए. बी. होडावडेकर व एस. ए. कदम वकील डी. पी. चाचा आणि पी. ए. ठाकोर लोकअदालतमध्ये सहभागी झाले होते. याचे यशस्वी आय़ोजन अप्पर प्रबंधक निलम शाहीर व अतुल ग. राणे आणि कर्मचारी वृंदाने केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra