Breaking News
आर के फाउंडेशन आयोजित महिलांसाठी मार्गदर्शन आणि मनोरंजनपर कोण होणार पैठणीची मानकरी हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष राम कदम आणि सचिव सुप्रिया कदम यांच्या मार्गद्शनाखाली शिवाजी विद्यालयाच्या सुसज्ज अशा सभागृहात संपन्न झाला.
सुप्रसिध्द निवेदक निलेश घाडी यांच्या कुशल संयोजनात पैठणीचा खेळ रंगला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सुप्रसिध्द कीर्तनकार वीणा त्यागराज खाडिलकर यांनी आपल्या मनोगतात महिलांना वैद्कीयदृष्ट्या तपासण्या करून घ्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन केले.
एल आय सी मार्केटिंग मॅनेजर हेमा सिंह भाजपच्या जान्हवी राणे मनसे सरचिटणीस सुप्रिया दळवी ग्रेसी सिंग गीता शिंदे सरिता जाधव शिवसेनेच्या अनुराधा इनामदार आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते
गुरुदत्त वाकदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra