होळीसाठी कोकणात एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस धावणार

मुंबई  : यंदाच्या वर्षीही मुंबईतून जाणाऱ्या चाकरमान्यांचा शिमगा विनाविघ्न पार पडावा यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मार्च ते १२ मार्च या कालावधीत या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.


गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली आहे. महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल परळ कुर्ला बोरिवली ठाणे वसई नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड चिपळूण रत्नागिरी कणकवली सावंतवाडी मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


दरम्यान चाकरमान्यांना आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच एसटीच्या मोबाईल आरक्षण अॅपची सुविधा देखील महामंडळाकडून करण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट