शिवाजी विद्यालयाच्या आलिशान सभागृहात पार पडला देखणा सौंदर्य सन्मान सोहळा !!!

शेखर छत्रे काळाचौकी


केतकी खोत ठरली काळाचौकीची पहिली फ्युजन फॅशन क्विन !!!!


अभ्युदय नगरमधील शिवाजी विद्यालयाच्या आलिशान सभागृहात पार पडला देखणा सौंदर्य सन्मान सोहळा !!!

आनंदी महिला प्रतिष्ठान च्या सर्वेसर्वा रुपाली चांदे यांनी आयोजित केलेला महिलांच्या सौंदर्य आणि टॅलेंट चा शोध घेणारा आत्मविश्वास  वाढवणारा अभ्युदय नगर आणि परिसरातील पहिलाच फॅशन शो जबरदस्त प्रतिसादात संपन्न झाला.

परीक्षक म्हणून 2019ची विश्वसुंदरी पूर्वी गडा व चित्रपट निर्माती गौरी चौधरी यांना परिक्षणासाठी पाचारण केले होते.

या कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच नव ऊर्जा फाउंडेशन च्या धनश्री विचारे आणि सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनेक स्थानिक कलाकारांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.गणेश गारगोटे  यांची मीडिया वन ही इव्हेंट कंपनी नृत्यदिग्दर्शक विकी जैस्वाल सचिन रावत यांचेही सहकार्य या सोहळ्यात उल्लेखनीय होते. सावंत यांनी भारतीय आणि विदेशी संस्कृती चे अनोखे फ्युजन असलेल्या या स्पर्धेचे कौतुक करत महिलांना घराचा उंबरठा ओलांडून भरारी घेणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

सागर सातपुते याने प्रवाही सूत्रसंचालन केले

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट