खेळ पैठणीचा

जिजामाता नगर पूर्व विभाग  काळाचौकी  आणि आर के .फाऊंडेशन चे राम कदम आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या विद्यमाने स्थानिक महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच  खेळ पैठणीचा  हा महिलांमध्ये लोकप्रिय असलेला कार्यक्रम शनिवार दिनांक २५/०२/२०२३ मंडळाच्या पटांगणात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिध्द गायक सुहास पांचाळ यांचा सुमधुर संगीतमय कार्यक्रमाने झाली. खेळ  पैठणीचा या कार्यक्रमाला विभागातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन सुप्रसिध्द कलाकार हास्यजत्रा फेम. आशिष सातपुते यांनी केले होते. या कार्यक्रमाला मनसे शाखाध्यक्ष राजेश मोरे शिवसेना उपशाखा प्रमुख सुभाष घरत सामाजिक कार्यकर्ते शेखर छत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Live Maharashtra
    Live Maharashtra

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Live Maharashtra

संबंधित पोस्ट