Breaking News
शेखर छत्रे
शिवाजी विद्यालय कन्याशाळेच्या वतीने आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काळाचौकी पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार रेवती खैरनार यांचा विशेष सत्कार करण्यात आला . यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या शाळेत असतानाच मला खाकी वर्दीचा अभिमान वाटायचा कुतूहल वाटायचं आणि म्हणून जेव्हा नोकरी साठी पोलीस रेल्वे आणि ग्रामसेवक होण्यासाठी निवड झाली तेव्हा मी तिथे ना जाता पोलीस खात्याची निवड केली. आणि मला याचा सार्थ अभिमान वाटतो आपण समोर ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना मी या विभागात सेवेची संधी मिळाली तर सोडू नका असे आवाहन करते तसेच जे पालक माता भगिनी आहेत त्यांना आश्वासन देते कधीही मला हाक मारा मी आणि माझे पोलीस ठाणे आपल्या संरक्षणासाठी हजर राहू.
शिवाजी विद्यालयाच्या आलिशान सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांचा भेटवस्तू देवून हृद्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळेची माजी विद्यार्थिनी सुप्रसिध्द भरतनाट्यम नर्तिका अपेक्षा घाटकर हिने सुद्धा उपस्थिती दर्शवली होती.
या कार्यक्रमासाठी गौरवी लोकेगावकर- इनचार्ज - कॅस्टल ब्लॅक इंटरनॅशनल हायस्कूल ज्योती राणे- मुख्याध्यापिका- एसएसएम एमसीएम गर्ल्स हायस्कूल रमा कारळे- पर्यवेक्षिका- एसएसएम एमसी एम गर्ल्स हायस्कूल
मंगल कांबळे- मुख्याध्यापिका- एसएसएम प्राथमिक शाळाशुभा पेडणेकर- मुख्याध्यापिका- एसएसएम नित्यानंद बालमंदिर शिक्षिका आणि महिला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra